पाकची पुन्हा आगळीक
By Admin | Updated: October 23, 2014 04:41 IST2014-10-23T04:41:27+5:302014-10-23T04:41:27+5:30
तीन दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने बुधवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य बनविले.

पाकची पुन्हा आगळीक
जम्मू : तीन दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानने बुधवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांना लक्ष्य बनविले.
रामगडचे ठाणेदार सतीशकुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास रामगड सेक्टरमधील नारायणपूर सीमा चौकीवर लहान शस्त्रांनी मारा केला. भारतीय जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता, अशी माहिती त्यांनी दिली. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानेही पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याला दुजोरा दिला. या गोळीबारात कुठलीही जीवित हानी झाली नाही. शस्त्रसंधीचे हे उल्लंघन ७२ तासांनंतर झाले आहे. यापूर्वी १९ आॅक्टोबरला पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्याच्या परगवाला सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. १७ आणि १८ आॅक्टोबरलाही जम्मू जिल्ह्याच्या मकवाल आणि अल्लाह माही दा कोठे क्षेत्रातील सीमा चौक्यांवर गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था)