पाकला दहशतवादाच्या आरोपातूनही वाचविले

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:06+5:302015-06-25T23:51:06+5:30

भारताशी मैत्रीचे नाटक करणाऱ्या चीनचा खरा हेतू आता समोर येत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे जिथे पाक दहशतवादाच्या पाठिंब्यामुळे अडचणीत येईल, तिथे चीन पाकला वाचवत आहे.

Paket saved even from terrorism charges | पाकला दहशतवादाच्या आरोपातूनही वाचविले

पाकला दहशतवादाच्या आरोपातूनही वाचविले

नवी दिल्ली : भारताशी मैत्रीचे नाटक करणाऱ्या चीनचा खरा हेतू आता समोर येत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे जिथे पाक दहशतवादाच्या पाठिंब्यामुळे अडचणीत येईल, तिथे चीन पाकला वाचवत आहे.
ब्रिस्बेन येथे अलीकडेच झालेल्या आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) बैठकीत भारताने लष्कर-ए-तोयबाचे आर्थिक स्रोत गोठवावेत अशी मागणी केली होती, त्याला चीनने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. भारताने चीनच्या संयुक्त राष्ट्रातील निर्बंध समितीतील पावित्र्याला आक्षेप घेतला होता. त्यानंतरही चीनने एफएटीएफच्या बैठकीत भारताच्या प्रस्तावाला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली.

Web Title: Paket saved even from terrorism charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.