भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना पाकमध्ये धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 04:16 IST2019-01-23T04:16:52+5:302019-01-23T04:16:57+5:30
पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचा-याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.

भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना पाकमध्ये धमकी
नवी दिल्ली : येथील पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचा-याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. त्याचा बदला म्हणून इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातल्या दोन कर्मचा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची धमकी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
१५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भारतीय दूतावासाचे दोन कर्मचारी कार्यालयात जात असताना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाºयांनी त्यांना वाटेत अडविले. कर्मचाºयाविरोधात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत ते या दोघांकडे चौकशी करू लागले.
>चौकशीची मागणी
दोन कर्मचाºयांना पाकिस्तानी गुप्तचर अधिकाºयांनी धमकी दिल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडे केली आहे.