शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला करायची होती २६/११ ची पुनरावृत्ती?; एनआयएनं कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 12:09 IST

एनआयएकडून पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा वॉन्टेड लिस्टमध्ये समावेश

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहिल्यांदाच पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा समावेश वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. या अधिकाऱ्याचा फोटोदेखील एनआयएने जारी केला आहे. आमीर जुबेर सिद्दीकी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सिद्दीकीसोबतच दोन अन्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेशदेखील एनआयएने वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. आमीर जुबेर सिद्दीकी कोलंबोतील पाकिस्तानातील उच्चायुक्तालयात व्हिसा समुपदेशक म्हणून काम करतो. अमेरिका आणि इस्रायलच्या दुतावासांवर २६/११ सारखा हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप सिद्दीकीवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण भारतातील लष्कराच्या आणि नौदलाच्या तळांवर हल्ल्याचा कट आखण्याचा आरोपदेखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. श्रीलंकेतील उच्चायुक्तालयात तैनात असलेला आणखी एक पाकिस्तानी अधिकारीदेखील यामध्ये सहभागी असल्याची माहिती एनआयएने दिली आहे. त्यामुळेच एनआयएने या अधिकाऱ्यांचा समावेश वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. याशिवाय या अधिकाऱ्यांविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी मागणीदेखील एनआयएकडून केली जाणार आहे. एनआयएच्या वॉन्टेड लिस्टमध्ये नावाचा समावेश झाल्याने आमीर जुबेर सिद्दीकीला पाकिस्तानने मायदेशी बोलावल्याचे वृत्त आहे. एनआयएने सिद्दीकीविरोधात फेब्रुवारीत आरोपपत्र तयार केले आहे. मात्र इतर तीन अधिकाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndiaभारत