शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

पाकने छुपे युद्ध सुरूच ठेवलेय! त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 05:42 IST

कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.

द्रास (कारगिल) : पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही आणि विषय धगधगता राहावा यासाठी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरूच ठेवले आहे. मात्र, दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत, आमचे शूर जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.

अग्निपथ योजना म्हणजे लष्कराने हाती घेतलेल्या आवश्यक सुधारणांपैकी एक आहे. परंतु विरोधकांनी त्यातही राजकारण केल्याची टीका मोदी यांनी केली.

३० वर्षांनंतरच्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईन का?‘सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी अग्निपथ योजना आणली, असा गैरसमज काही लोक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचाराची लाज वाटते; पण त्यांना विचारले पाहिजे. मोदींच्या राजवटीत आज ज्यांची भरती होईल त्यांना पेन्शन आताच द्यावी लागेल का? त्याला पेन्शन देण्याची वेळ ३० वर्षांनी येईल. मोदी तेव्हा १०५ वर्षांचे असतील आणि तेव्हा मोदींचे सरकार असेल का? ३० वर्षांनंतर द्याव्या लागणाऱ्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईल, असे राजकारणी मोदी आहेत का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

यांनीच सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे केले‘हे तेच लोक आहेत, ज्यांनी सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे करून आमचे सैन्य कमकुवत केले. त्यांचीच हवाई दलाला कधीही आधुनिक लढाऊ विमाने मिळू नयेत, अशी इच्छा होती. यांनीच तेजस लढाऊ विमान थंडबस्त्यात टाकण्याची तयारी केली होती’, असा आरोपही मोदींनी विरोधकांवर केला. 

तरुणांत अग्निवीरबद्दल प्रचंड संताप : खरगेमोदी सरकारने लष्कराच्या सांगण्यावरून अग्निपथ योजना लागू केली, हे उघड खोटे आहे आणि बलाढ्य लष्कराचा अक्षम्य अपमान आहे. माजी लष्करप्रमुख (निवृत्त) जनरल एमएम नरवणे यांनी सांगितले आहे की ‘अग्निपथ योजनें’तर्गत ७५% लोकांना कायम ठेवायचे होते आणि २५% लोकांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त करायचे होते; पण मोदी सरकारने याच्या उलट केले आणि तिन्ही लष्करी दलांमध्ये ही योजना जबरदस्तीने लागू केली.  देशातील तरुणांमध्ये अग्निवीरबद्दल प्रचंड संताप आणि तीव्र विरोध आहे. अग्निपथ योजना बंद करावी, ही काँग्रेसची मागणी कायम आहे.-मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

१.२५  लाख कोटी रुपयांहून अधिक निधी माजी सैनिकांना मोदी सरकारने दिला ५०० कोटींचा निधी देत काँग्रेस ‘वन रँक, वन पेन्शन’वर खोटे बोलली, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान