पाक कलाकार वाद- अशोक पंडित यांची सलमान खानवर टीका

By Admin | Updated: September 30, 2016 18:21 IST2016-09-30T18:21:20+5:302016-09-30T18:21:20+5:30

ते देशाच्या दुःखात सहभागी नसतील तर त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही,अशोक पंडित यांनी सलमानला सुनावलं.

Pak artist Debra- Ashok Pandit criticizes Salman Khan | पाक कलाकार वाद- अशोक पंडित यांची सलमान खानवर टीका

पाक कलाकार वाद- अशोक पंडित यांची सलमान खानवर टीका

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -  'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं अयोग्य आहे' अशी भूमिका अभिनेता सलमान खानने मांडली. सलमानच्या भूमिकेवर चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी टीका करत सलमानला प्रत्युत्तर दिलं आहे.  
 

एका पाठोपाठ एक ट्वीट करत पंडित यांनी सलमानला चांगलंच सुनावलं आहे.  'ज्या पाकिस्तानी कलाकारांना भारताने इतकं काही दिलं त्यांना जर देशाचं दुःख समजत नसेल आणि ते देशाच्या दुःखात सहभागी नसतील तर त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही. तुमच्या देशाने केलेल्या दहशतवादी कारवायांवर मौन पाळणं हे देखील दहशतवादी कृत्य आहे' असं ट्वीट अशोक पंडित यांनी केलं आहे. ट्वीट करताना त्यांनी सलमान खानला टॅग केलं आहे.

 

 Remaining Silent on the act of terrorism by your country is also a form of terrorism. @BeingSalmanKhan Sir.

 
 
 
 
आज दुपारी एका पत्रकार परिषदेत सर्जिकल स्ट्राईकबाबत सलमानला प्रश्न विचारण्यात आला असता  सर्जिकल स्ट्राईक योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू न देण्याच्या निर्णयाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला असता सलमानने ' कलाकार म्हणजे दहशतवादी नव्हेत असे सांगत ही बंदी योग्य नसल्याची भूमिका मांडली होती. 

Web Title: Pak artist Debra- Ashok Pandit criticizes Salman Khan