जोड-२ ईटखेडा

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:26+5:302015-03-14T23:45:26+5:30

अनेक दिवसांनी कल्पना

Pair-2 echkheda | जोड-२ ईटखेडा

जोड-२ ईटखेडा

ेक दिवसांनी कल्पना
गेल्या अनेक दिवसांपासून नळाला खराब पाणी येत आहे. परंतु याविषयी लवकर जाणीव न झाल्याने आजारांना सामोरे जावे लागले.
- अनुसया जगदाळे
कमी अधिक पाणी
गेल्या काही वर्षांत परिसर वाढला आहे; परंतु आजही येथील जलवाहिन्या जुन्या असल्याने काहींना कमी, तर काहींना अधिक पाण्याचा पुरवठा होत आहे.
-आसाराम म्हस्के
उद्यान हवे
महापालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्षे लोटली; परंतु मूलभूत सोयी-सुविधा मिळालेल्या नाहीत. परिसरात मुलांसाठी उद्यानाची सुविधा हवी.
- कडुबा जंगले
स्वच्छतागृह बंद
परिसरात दोन स्वच्छतागृह आहेत. परंतु त्यांची पार दुरवस्था झाली असून, कुलूपबंद करून ठेवण्यात आले आहे. परंतु त्यांची दुरुस्ती करून खुले करण्याची गरज आहे.
- बंडू त्रिभुवन
आरोग्य केंद्र हवे
परिसरातील नागरिकांना, महिलांना आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आरोग्य केंद्र नसल्याने नक्षत्रवाडीसह अन्य ठिकाणी ये-जा करण्याची वेळ येत आहे.
- गौतम सोनवणे
रस्ते नाहीत
घराजवळ पाईपलाईन नसल्यामुळे नळ घेण्यास अडचण येत आहे. शिवाय परिसरात रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- छाया कांबळे
विद्युत खांब नाहीत
परिसरात विद्युत खांब नसल्याने वीजपुरवठा मिळण्यास अडचणी येत आहेत. वीजपुरवठा मिळत नसल्याने घर अंधारात राहत आहे.
- अनिल गायकवाड
रात्रीच्या वेळी पाणी
चार दिवसांनी पाणी येते. त्यातही वेळी अवेळी पाणी सोडले जाते. रात्रीच्या वेळी पाणी येत असल्यामुळे दुर्घटनांनाही सामोरे जावे लागत आहे.
- देवा त्रिभुवन
रस्त्यांची दुरवस्थाच
पंधरा वर्षांपासून शंकरनगरमध्ये राहत आहे. परिसरातील रस्त्यांची अद्यापही दुरवस्था आहे. उद्यानाचीही दुरवस्था झालेली आहे.
- रामराव सूर्यवंशी
कर भरूनही असुविधा
मनपाला नियमितपणे कर भरूनही असुविधांना सामोरे जावे लागत आहे. नियमितपणे पाणी येत नाही. कचरा उचलण्यासाठी मनपाचे कर्मचारी येत नाहीत.
- जानकाबाई साबळे
प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून निराधार योजनेची फाईल मंजूर होत नाही. प्रशासनाचे ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे.
- धनुबाई कानडे
कोणीही नाहीत
नातेवाईक वगैरे कोणीही नाहीत; परंतु निराधार योजनेची फाईल मंजूर होत नाही. लोकप्रतिनिधीही आमच्या अडचणी ऐकून घेत नाहीत.
- कलाबाई कोरके
(जोड आहे)

Web Title: Pair-2 echkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.