शाहरूख खानच्या गाडीवर दगडफेक
By Admin | Updated: February 15, 2016 04:14 IST2016-02-15T04:14:54+5:302016-02-15T04:14:54+5:30
रईस’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे आलेल्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली.

शाहरूख खानच्या गाडीवर दगडफेक
अहमदाबाद : ‘रईस’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे आलेल्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. हे कृत्य करणाऱ्यांनी शाहरूखच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या घोषणाही दिल्या. एका हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारीवर दगडफेक झाली तेव्हा स्वत: शाहरूख गाडीत नव्हता. ‘रईस’ चित्रपटाचे दोन आठवड्यांपूर्वी भूज येथे चित्रीकरण सुरू असतानाही कर्मचाऱ्यास अशाच निषेधास सामोरे जावे लागले होते.