वकील संघातर्फे भवरलाल जैन यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:35+5:302016-02-29T22:02:35+5:30

जळगाव : जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हा न्यायालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

Paid tribute to Bhavarlal Jain by lawyer team | वकील संघातर्फे भवरलाल जैन यांना श्रद्धांजली

वकील संघातर्फे भवरलाल जैन यांना श्रद्धांजली

गाव : जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता जिल्हा न्यायालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ही शोकसभा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कोर्ट हॉलमध्ये पार पडली. शोकसभेला प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, न्या.के.पी. नांदेडकर, न्या.ए.के. पटनी, न्या.प्रीतीकुमार घुले, न्या.ए.डी. बोस, न्या.एस.एस. पाखले, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी, उपाध्यक्षा ॲड.स्वाती निकम, सचिव ॲड.गोविंद तिवारी यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य व सरकारी वकील उपस्थित होते. शोकसभेच्या सुरुवातीला स्व.भवरलाल जैन यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोमवारी सकाळच्या सत्रात वकील संघाच्या सभासदांनी कामकाजात सहभाग घेतला नाही. मात्र, दुपारनंतर दैनंदिन कामकाज सुरू झाले होते, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲड.लक्ष्मण वाणी यांनी दिली.

Web Title: Paid tribute to Bhavarlal Jain by lawyer team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.