पेड न्यूजला आळा घाला!

By Admin | Updated: May 11, 2016 03:22 IST2016-05-11T03:22:13+5:302016-05-11T03:22:13+5:30

देशात पेड न्यूजच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल राज्यसभेतील सर्व खासदारांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. अशा पेड न्यूजमुळे वाचकांची दिशाभूल होते

Paid News! | पेड न्यूजला आळा घाला!

पेड न्यूजला आळा घाला!

देशात पेड न्यूजच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल राज्यसभेतील सर्व खासदारांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. अशा पेड न्यूजमुळे वाचकांची दिशाभूल होते आणि पेड न्यूजला आळा घालण्यासाठी सरकारने प्रभावी पाऊल उचलले पाहिजे, अशी मागणी खासदारांनी पक्षभेद बाजूला सारून केली. भाजपाचे विजय गोयल यांनी शून्य तासात हा मुद्दा उपस्थित केला. बातम्यांच्या आडून प्रचार करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी चिंता जाहीर केल्यानंतर सूचना व प्रसारणमंत्री अरुण जेटली म्हणाले, पेड न्यूज ही नीतिभ्रष्टता आहे.

Web Title: Paid News!