गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:50+5:302015-08-26T23:32:50+5:30

रोकडे सावरगाव : येथील बापूजी विद्यालयातून शैक्षणिक वर्षामध्येशैक्षणिक वर्ष २०१५ मध्ये १२ वी १० वी ८ स्कॉलरशिपधारकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून बुधवारी सन्मनित करण्यात आले़

Paid delivery to meritorious students | गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

कडे सावरगाव : येथील बापूजी विद्यालयातून शैक्षणिक वर्षामध्येशैक्षणिक वर्ष २०१५ मध्ये १२ वी १० वी ८ स्कॉलरशिपधारकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून बुधवारी सन्मनित करण्यात आले़
रोकडा सावरगांव येथील शिक्षण प्रेमी व दानशूर व्यक्तींनी शिक्षणाला चालना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील ४८ देणगीदारांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यालयात प्रथम, व्दितीय , तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी मुख्याध्यापक व्ही़ व्ही़ गंपले हे उपस्थित होते तर प्रमुख पाहूणे म्हणून सरपंच गोविंदराव सुडे, सहकार बोर्डाचे संचालक बालाजी रोकडे, चेअरमन युवराज घोगरे, ज्येष्ठ नागरीक हुसेनसाब शेख, शिवकुमार घोटे, मोहन मरुडकर आदीची उपस्थिती होती़ यावेळी १२ वीत पु˜े अंगद, १० वीत शेख सोहेल, सातवी शेख साहेल, सातवी शिष्यवृत्तीधारक मुंडे महादेव, रोकडे नम्रता, पदातुरे सुदर्शन या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले़

Web Title: Paid delivery to meritorious students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.