पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला भेट दिलेल्या पर्यटकांनी या घटनेबद्दल अनेक खुलासे केले आणि अजूनही अनेक पर्यटक याबाबत माहिती देत आहेत. आता पश्चिम बंगालमधील एका महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे की, तिथल्या दहशतवाद्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की अजूनही बरंच फिरणं बाकी आहे, बसून मॅगी आणि मोमोज खा असं सांगितलं.
पूर्वाशा नावाच्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "पश्चिम बंगालमधील १० ते १२ जणांचा एक ग्रुप काश्मीरला फिरण्यासाठी आला होता. आम्ही २१ एप्रिल रोजी काश्मीरला पोहोचलो आणि २२ एप्रिल रोजी बैसरनला भेट देण्यासाठी गेलो. ही दुर्घटना घडण्याच्या काही तास आधी आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि मजा करत होतो. बराच वेळ गेल्यानंतर, घोडेस्वाराने माझ्या मित्राच्या पतीला सांगितलं की जर ते एका तासापेक्षा जास्त वेळ असतील तर प्रति व्यक्ती ५०० रुपये शुल्क आकारलं जाईल. ६,००० रुपये जास्त खर्च होईल हा विचार करून आम्ही सर्व एकत्र आलो."
"तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
"अजून खूप काही पाहायचं बाकी आहे"
"आम्ही रील बनवत होतो आणि त्याच वेळी आमची एक मैत्रीण पडली आणि तिच्या कपड्यांवर चिखल लागला. अशा परिस्थितीत, आम्हाला सर्वांना वाटलं की तिच्या कपड्यावर चिखल लागलाय आणि आणखी थोडा वेळ थांबलो तर जास्त पैसे लागतील, म्हणून इथून निघून जाण्याचा विचार करावा. आम्ही निघू लागताच ४ ते ५ जणांनी आम्हाला घेरलं आणि म्हणू लागले, अरे, तुम्ही कुठे जात आहात, अजून खूप काही पाहायचं बाकी आहे."
दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
"आम्ही तुमच्यासाठी मोमोज बनवू, ते खा आणि मग जा"
"ते लोक आम्हाला जबरदस्तीने थांबवत होते. ते म्हणत होते की, तुम्ही जाण्यापूर्वी चहा प्या आणि मॅगी खाऊन जा. आम्हाला हे सर्व करायचं नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. आमची मैत्रीण पडली आहे आणि तिचे कपडे खराब झाले आहेत, म्हणून आम्ही खाली जातोय असं सांगितलं. मग ते आम्हाला म्हणाले की, तुम्ही अजून काहीही पाहिलेलं नाही, जरा फिरून या. आम्ही तुमच्यासाठी मोमोज बनवू, ते खा आणि मग जा. ते लोक आमचा रस्ता सोडत नव्हते. माझ्या बहिणीने त्यांना फटकारलं आणि आम्ही निघून आलो."
"लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
"आम्हीही वेगाने धावत टॅक्सी स्टँडवर पोहोचलो"
"आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला आम्हाला वाटलं की, हा कसला तरी वेगळाच आवाज असेल. काही वेळाने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्हाला समजलं की दहशतवादी हल्ला झाला आहे. मग आम्हीही वेगाने धावत टॅक्सी स्टँडवर पोहोचलो. वाटेत आम्हाला दिसलं की सीआरपीएफ आणि रुग्णवाहिका धावत होत्या" असं पूर्वाशाने सांगितलं आहे.