शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:26 IST

भारतीय लष्कराकडून पहलगामच्या जंगलात विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात असल्याची माहिती आहे.

Pahalgam Attack: जम्मू-काश्मिरातील पहलगाम इथं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणाऱ्या नराधम दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून वेगवान मोहीम राबवली जात आहे. अशातच प्रशासनाकडून यातील तीन दशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलं आहे.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने तीन दहशतवाद्यांचे स्केच तयार करून जारी केले आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेऊन खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराकडून पहलगामच्या जंगलात विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात असल्याची माहिती आहे.

हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे लपले?

पहलगाम इथं पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्यानंतर हे दहशतवादी जंगलातून त्यांच्या सुरक्षित अड्ड्यावर गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहलगामच्या जंगलात सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार शोध मोहीम सुरू आहे. भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीर पोलीसही या नराधमांचा शोध घेत आहेत. गृहमंत्र्यांकडून पीडितांची भेट

पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले असून आज सकाळी त्यांनी या हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटत शाह यांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, अमित शाह यांच्या या भेटीवेळी पीडितांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानAmit Shahअमित शाह