शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:40 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या हाती मोठं यश लागलं असून, पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

दोन महिन्यांपूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटक मारले गेले होते. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले होते. मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी मात्र सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएच्या हाती मोठं यश लागलं असून, पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

अटक करण्यात आलेले दोघेही काश्मिरी असून, त्यांची ओळख पहलगाममधील बटकोट येथील रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि हिल पार्क येथील रहिवासी बशीर अहमद जोथर अशी पटली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांनी पहलगाममधील हिल पार्क येथे असलेल्या झोपडीमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता, असे असे या हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयच्या तपासामधून समोर आहे होते. या दोघांनीही दहशतवाद्यांना जेवण, आश्रय आणि रसद पुरवली होती. एवढंच नाही तर सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी त्यांची ओळखही लपवली होती.

एनआयएने या दोघांविरोधात बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा, १९६७ (यूएपीए)च्या कलम १९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी आणखीही अटकेच्या कारवाया होऊ शकतात, असे संकेत एनआयएने दिले आहेत.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाArrestअटक