पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक नवीन खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दहशतवाद्यांना बेताब व्हॅलीवर हल्ला करायचा होता परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि बैसरन व्हॅलीला टार्गेट केलं. दहशतवाद्यांनी पहलगाममधील सर्व पर्यटन स्थळांची रेकी केली होती. दहशतवाद्यांनी आडू व्हॅली, बेताब व्हॅली आणि बैसरनची रेकी केली होती. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांसह दोन स्थानिक दहशतवादी आणि पाच ओव्हरग्राऊंड वर्करचा समावेश होता. हे लोक आठवडाभर पहलगामच्या जंगलात फिरत होते.
बेताब व्हॅलीला टार्गेट करण्याचा प्लॅन
रेकी केल्यानंतर या दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीला टार्गेट करण्याचा प्लॅन आखला होता. सर्व नियोजनानंतर शेवटच्या क्षणी प्लॅन बदलण्यात आला आणि दहशतवादी बैसरन व्हॅलीत पोहोचले. या भागातून हल्ला करणं आणि पळून जाणं सोपं वाटत होतं. शेवटपर्यंत दहशतवाद्यांनी त्यांच्या हल्ल्याच्या नियोजनाची माहिती त्यांचे सहकारी ओव्हरग्राउंड वर्कर, पाकिस्तानी हँडलर आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांव्यतिरिक्त कोणालाही दिली नाही.
हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
दोन दिवसांच्या ट्रॅकिंगनंतर बैसरनला पोहोचले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी बैसरनकडे गेले आणि दोन दिवसांनंतर ते बैसरनजवळील जंगलात पोहोचले. येथे रेकी करणारे स्थानिक दहशतवादी त्यांना भेटले. त्यावेळी तिथे कोणतंही ओव्हरग्राउंड वर्कर उपस्थित नव्हता. हे लोक दोन दिवस राहिले. यानंतर २२ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला.
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
२२ एप्रिल रोजी पर्यटकांवर हल्ला
२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केलं होतं. येथे पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून परतले आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.