शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 20:24 IST

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे.

जेव्हा दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात हल्ला केला, तेव्हा लोक भयभीत होऊन तंबूत लपले होते. दहशतवादी पर्यटकांवर निर्दयीपणे गोळीबार करत होते. यावेळी पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे आणि त्यांचे कुटुंबही जीव वाचवण्यासाठी तंबूत लपले. मात्र, दहशतवाद्यांनी या ५४ वर्षीय व्यावसायिकाला तंबूतून बाहेर काढले आणि एक आयत म्हणायला सांगितली. मात्र त्यांना ती म्हणता आली नाही. यानंतर, दहशतवाद्यांनी जगदाळे यांच्यावर गोळ्या झाडल्या.

जगदाळे यांच्या मुलीने सांगितला भयावह प्रसंग - व्यावसायिक जगदाळे यांची मुलगी असावरी म्हणाली, एका टेकडीवरून खाली उतरताना आम्हाला गोळीबार होत असल्याचा आवाज आला. आई (प्रगती) आणि वडील (संतोष जगदाळे) आम्ही इतर पर्यटकांसह जवळच्याच एका तंबूत धावलो. आम्हाला वाटले की हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. मात्र, काही वेळातच एक भयावह आदेश आला. "तू बाहेर ये." हल्लेखोरांनी तिच्या वडिलांना तंबूतून बाहेर खेचले आणि नंतर त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा आरोप लावला.

'हिंदू आहात की मुस्लीम' -आसावरी म्हणाली, जवळपास बरेच पर्यटक होते. मात्र, दहशतवाद्यांनी पुरुषांनाच लक्ष्य केले आणि हिंदू आहात, की मुस्लीम? असे विचारले. २६ वर्षीय आसावरी म्हणाली, 'यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना एक इस्लामिक आयत (कदाचित कलमा) म्हणायला सांगितले.' मात्र, त्यांना ते म्हणता आले नाही. यानंतर त्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, एक डोक्यात, एक कानाच्या मागे आणि एक पाठीवर. यानंतर, बंदूकधाऱ्यांनी तिच्या काकांकडे बघितले आणि त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. यानंतर साधारणपणे २० मिनिटांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले.या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादDeathमृत्यूterroristदहशतवादी