शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:25 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात आहे. याच दरम्यान जम्मू-काश्मीरहून परतलेले पर्यटक श्रीजित रमेशन म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी घटनेबाबत एनआयएच्या तपासात ते सहकार्य करतील. श्रीजीत रमेशन यांनी २६ एप्रिल रोजी दावा केला होता की, त्यांच्याकडे एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये दोन दहशतवादी दिसत आहेत. या संदर्भात एनआयएच्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला आहे.

एनआयए मुख्यालयातून आला फोन

श्रीजीत रमेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मला मुंबईतील एनआयए मुख्यालयातून फोन आला. त्यानंतर, मी एसपी, एनआयए मुंबई, डीवायएसपी आणि तांत्रिक टीमसह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी जवळजवळ पाच तास चर्चा केली. चर्चेदरम्यान, त्यांनी माझा प्रवास कसा सुरू झाला, मी कुठे राहिलो, मी कोणते हॉटेल बुक केलं, माझ्यासोबत कोणते स्थानिक टूर ऑपरेटर आणि ड्रायव्हर्स होते आणि इतर तपशीलवार माहिती विचारली. मी माझ्याकडून सर्व माहिती त्यांच्यासोबत शेअर केली आहे. जरी मला चौकशीसाठी दिल्लीला बोलावले तरी मी नक्कीच जाईन.

१२ सेकंदांचा मुलीचा व्हिडीओ

श्रीजीथ रमेशन 26 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधून परतले. त्यांनी सांगितलं की, १८ एप्रिल रोजी ते पहलगाममधील त्याच ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते जिथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. इथे त्यांनी त्यांच्या मुलीचं रील शूट केलं. फक्त १२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन लोक निघून जाताना दिसत आहेत. पर्यटकाचा दावा आहे की, हे दोघेही तेच दहशतवादी असू शकतात ज्यांचं स्केच घटनेनंतर सुरक्षा दलांनी जारी केलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी हे फोटो आणि व्हिडिओ राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सोपवले आहेत.

श्रीजीत रमेशन म्हणाले, आम्ही १८ एप्रिल रोजी पहलगाममध्ये होतो. तिथून आम्ही ७.५ किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी गेलो. गुलमर्गमध्ये वेळ घालवल्यानंतर, जेव्हा आम्ही पुण्याला परतत होतो, तेव्हा आम्हाला पहलगाममधील हल्ल्याची माहिती मिळाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही यापैकी दोघांना कुठेतरी पाहिलं आहे. गुलमर्ग, पहलगाम आणि इतर ठिकाणी  मोबाईलवरून फोटो आणि व्हिडीओ काढले होते. पहलगाममध्ये बनवलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांसारखे दिसणारे दोन लोक दिसले.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी