शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:14 IST

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुभमची पत्नी ऐशान्या अवस्था अत्यंत वाईट आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुभमची पत्नी ऐशान्या अवस्था अत्यंत वाईट आहे. ती वारंवार म्हणत आहे की,  "माझ्या शुभमला परत आणा. शुभमचं लग्न होऊन काही महिनेच झाले होते. दोघांनीही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं पण दहशतवादी हल्ल्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला."

दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ऐशान्या आणि शुभम कॅफेमध्ये बसले होते. दोघांनीही मॅगी ऑर्डर केली होती. शुभम खुर्चीवर बसून आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत होता, तर ऐशान्या जवळच उभी होती. एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि शुभमला विचारलं की, तू हिंदू आहेस की मुस्लिम? कलमा वाचून दाखव.  दहशतवाद्यांनी शुभमच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचा जागीच मृत्यू झाला.

"भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना

"माझ्या शुभमला परत आणा”

"मला काहीही समजत नाही, जे काही घडलं ते माझ्या डोळ्यासमोर घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आम्ही दोघे एकत्र गेलो, पण तो एकटा कसा गेला? त्याने मला वचन दिलं की तो नेहमीच माझ्यासोबत राहील. माझ्या शुभमला परत आणा, तो एक चांगला माणूस होता. त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"

"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

“मी माझं दुःख कोणाला सांगू?"

"आता मी माझ्या गोष्टी कोणासोबत शेअर करू, मी माझं दुःख कोणाला सांगू? आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. या घटनेने सर्व काही उद्ध्वस्त झालं. जर आम्ही काश्मीरला गेलो नसतो तर माझा शुभम आज माझ्यासोबत असता. मी काश्मीरहून परत आले, पण माझा शुभम कधीच परत येणार नाही" असं ऐशान्याने म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभमच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी