शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:42 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांकडून विविध विधाने येत आहेत.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केले आहे की, या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा भोगावी लागेल. पण, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या या सर्व प्रतिक्रियांवर राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी नाराजपहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. पण, काही काँग्रेस नेते या घटनेबाबत वादग्रस्त विधाने देत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियांवर नाराज आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, आता पक्षाच्या नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावापेक्षा वेगळी विधाने जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. 

युद्धाची गरज नाही - सिद्धरामय्याकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते की, पाकिस्तानशी युद्धाची गरज नाही. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. या विधानावरून भाजपने सिद्धरामय्या तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध अनेक ठिकाणी निदर्शनेही केली. मुख्यमंत्र्यांशिवाय, कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हल्ला केलाय नाही, असे ते म्हणाले. यावरुनही मोठा वाद झाला आहे.

राहुल गांधींनी घेतली जखमींची भेटकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (25 एप्रिल) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमी आणि पीडितांची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की, जे काही घडले आहे, ते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने घडले आहे. ही घटना म्हणजे, भावाला भावाविरुद्ध उभे करण्याचे षड्यंत्र आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन दहशतवाद्यांचे नापाक प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा