शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:47 IST

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाचे निमंत्रण पाठवले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने विविध देशात आपले प्रतिनिधी पाठवून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केले. असे असतानाही अमेरिका याच पाकिस्तानला जवळ करू पाहत आहे. यामुळेच आता अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला १४ जून रोजी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाचे निमंत्रण पाठवले आहे. दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमेरिकेचा हेतू काय आहे?जयराम रमेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'अमेरिकेच्या लष्कर दिनानिमित्त (१४ जून) वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरला निमंत्रण दिले आहे. ही बातमी भारतासाठी राजनैतिक आणि सामरिकदृष्ट्या मोठा धक्का आहे. हा तोच व्यक्ती आहे, ज्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी प्रक्षोभक आणि भडकावणारी भाषा वापरली होती. आता प्रश्न असा पडतो की, अमेरिकेचा हेतू काय आहे? अलीकडेच, यूएस सेंट्रल कमांडच्या प्रमुखांनीही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तान अमेरिकेचा 'भागीदार' असल्याचे विधान केले होते."

विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 'मोदी सरकार म्हणते की, ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तानी लष्करप्रमुखाचे अमेरिकन लष्कर दिनाला पाहुणा म्हणून उपस्थित राहणे, ही निश्चितच गंभीर चिंतेची बाब आहे. ट्रम्प प्रशासन सतत अशी विधाने करत आहे, ज्याचा अर्थ असा काढता येईल की, अमेरिका आता भारत आणि पाकिस्तानकडे एकाच पातळीवर पाहत आहे. एकीकडे पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबद्दल अमेरिकेसह संपूर्ण जगाला माहिती देऊन परतलेल्या शिष्टमंडळाचे पंतप्रधान स्वागत करत आहेत अन् दुसरीकडे अमेरिकेतून अशाप्रकारच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे भारताची राजनैतिक भूमिका आणखी अस्वस्थ होते.'

'पंतप्रधानांनी आता आपला हट्टीपणा आणि प्रतिष्ठेची चिंता बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे, जेणेकरून देश आपली सामूहिक इच्छा स्पष्टपणे व्यक्त करू शकेल आणि देशासमोर एक ठोस रोडमॅप सादर करता येईल. दशकांची राजनैतिक प्रगती इतक्या सहजपणे कमकुवत होऊ देता येणार नाही,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. यावर अद्याप भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.

पाकिस्तानी लष्करप्रमुख अमेरिकेला जाणारपाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेला भेट देणार आहे. १४ जून रोजी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते सहभागी होतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावानंतर असीम मुनीरचा हा पहिलाच परदेश दौरा असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका