जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगड भाजपा कार्यकर्ते अरविंद अग्रवाल थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यादरम्यान त्यांचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी स्थानिक गाईड नजाकत अहमद शाह याचे आभार मानले आहेत. या हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. नजाकतचा चुलत भाऊ सय्यद आदिल हुसेन शाह (३०) याचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे.
अरविंद अग्रवाल त्यांच्या पत्नी आणि मुलीसह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. हल्ला झाला तेव्हा नजाकतने त्यांची पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठिकाणी नेलं. या काळात नजाकतने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत केली. अरविंद अग्रवाल फोटो काढत होते. मग अचानक गोळीबार सुरू झाला. त्यांची चार वर्षांची मुलगी आणि पत्नी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर होत्या. नजाकत (२८) त्याच्यासोबत होता. नजाकत लगेच सर्वांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. यानंतर तो अग्रवाल यांच्या पत्नीला वाचवण्यासाठी परत गेला.
"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
अग्रवाल म्हणाले की, एक तास त्यांना कळालं नाही की, त्यांचं कुटुंब सुरक्षित आहे की नाही. नंतर रुग्णालयात त्यांना त्यांची पत्नी आणि मुलगी दिसली. जर नजाकत नसता तर काय झालं असतं हे मला माहित नाही... अग्रवाल यांच्या पत्नीचे कपडे फाडले होते. पण स्थानिक लोकांनी त्यांना घालण्यासाठी कपडे दिले. नजाकतने सांगितलं की, जिपालाईनजवळ गोळीबार होत होता. ही जागा त्यांच्यापासून जवळपास २० मीटर अंतरावर होती.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
नजाकतने सर्वांना आधी खाली वाकायला सांगितलं आणि नंतर एक जागा पाहिली आणि तिथे लहान मुलांना जायला सांगितलं. यामुळेच दहशतवादी त्यांच्यापर्यंत येईपर्यंत हे लोक तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. नजाकतला अग्रवाल यांची पत्नी दिसली. तो त्यांना आपल्या कारने घेऊन आला आणि नंतर सर्वांनाच सुरक्षितपणे श्रीनगरला पोहचवलं.