जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेमुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी आज उद्ध्वस्त केली. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, ते स्फोट घडवून उडवण्यात आलं आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.
दहशतवाद्याच्या बहिणीचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये तिने न्यूज एजन्सी एएनआयशी संवाद साधला. "माझा एक भाऊ जेलमध्ये आहे आणि दुसरा मुजाहिदीन आहे. मला दोन बहिणी आहेत. काल मी इथे आले तेव्हा मला माझे आईवडील आणि नातेवाईक सापडले नाहीत. मला सांगण्यात आलं की पोलिसांनी त्यांना अटक केली आहे" असं महिलेने म्हटलं आहे.
"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
"आमचं कुटुंब निष्पाप, घर उद्ध्वस्त केलं"
"दहशतवादी हल्ल्याबद्दल आम्हाला काही माहित नाही. सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी माझ्या भावाला पकडावं. आम्हाला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. आमचं कुटुंब निष्पाप आहे आणि मला माहित नाही की भाऊ या हल्ल्यात सामील आहे की नाही. आमच्या कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नाही. मी इथे असताना सुरक्षा दलाचे लोक आले आणि मला शेजाऱ्याच्या घरी जाण्यास सांगितलं. त्यांनी आमच्या घरात बॉम्बसारखं काहीतरी ठेवलं, त्यानंतर त्यांनी आमचं घर उडवून दिलं. आम्ही निर्दोष आहोत. आमचं घर उद्ध्वस्त केलं आहे. आम्हाला काहीही माहित नाही" असं दहशतवाद्याच्या बहिणीने म्हटलं आहे.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बेसरन खोऱ्यात हल्ला केल्यानंतर आसिफ शेख आणि आदिल हे दोघेही फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी लष्कराकडून जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. आदिल शेख या दहशतवाद्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तो २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला होता. पहलगामध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यानेच दहशतवाद्यांना बेसरन खोऱ्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहेत.