Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत तीव्र कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय सैन्याकडून सातत्याने याबाबत माहिती दिली जात आहे. आजही(12 मे) भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.
दरम्यान, पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्यांना योग्य उत्तरच दिले नाही, तर पाकचे वाईट हेतूही उध्वस्त केले, हे दाखवण्यात आले. या व्हिडिओची सर्वात खास गोष्ट म्हणजे, या व्हिडिओच्या बॅग्राउंडला प्रसिद्ध कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांची कविता लावण्यात आली. 'याचना नहीं, अब रण होगा...जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. ' या ओळीचा वापर या व्हिडिओत करण्यात आला.
या कवितेसह भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ खूप प्रभावी वाटला. ही कविता वीर आणि रौद्र भावनांमध्ये लिहिलेली असून, दिनकर यांच्या 'रश्मीरथी' या महाकाव्यात दिसते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हस्तिनापूरला पोहोचतात आणि युद्ध थांबवण्याचे आवाहन करतात, त्या प्रसंगावर ही कविता आधारलेली आहे.
सैन्यप्रमुखांचा पाकिस्तानला इशारापत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, आपल्याला हवाई संरक्षण कारवाईला समजून घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्यानुसारच कारवाई केली. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. पाकिस्तानने ही लढाई स्वतःची बनवली, म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते.
दिनकर यांच्या कवितेचे संक्षिप्त रुप...
मैत्री की राह बताने को,सबको सुमार्ग पर लाने को,दुर्योधन को समझाने को,भीषण विध्वंस बचाने को,भगवान हस्तिनापुर आये,पांडव का संदेशा लाये।
पर, इसमें भी यदि बाधा हो,तो दे दो केवल पांच ग्राम,रखो अपनी धरती तमाम।हम वहीं खुशी से खायेंगे,परिजन पर असि न उठायेंगे!
दुर्योधन वह भी दे ना सका,आशीष समाज की ले न सका,उलटे, हरि को बांधने चला,जो था असाध्य, साधने चला।जब नाश मनुज पर छाता है,पहले विवेक मर जाता है।
हरि ने भीषण हुंकार किया,अपना स्वरूप-विस्तार किया,डगमग-डगमग दिग्गज डोले,भगवान् कुपित होकर बोले-जंजीर बढ़ा कर साध मुझे,हाँ, हाँ दुर्योधन! बांध मुझे।
हित-वचन नहीं तूने माना,मैत्री का मूल्य न पहचाना,तो ले, मैं भी अब जाता हूं,अन्तिम संकल्प सुनाता हूं।याचना नहीं, अब रण होगा,जीवन-जय या कि मरण होगा।
टकरायेंगे नक्षत्र-निकर,बरसेगी भू पर वह्नि प्रखर,फण शेषनाग का डोलेगा,विकराल काल मुंह खोलेगा।दुर्योधन! रण ऐसा होगा।फिर कभी नहीं जैसा होगा।