शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 16:02 IST

India-Pakistan War Scenario: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत.

India-Pakistan War Scenario: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, असा पवित्रा सरकारने घेतला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने पाकिस्तानी दूतावास बंद केले असून, सिंधू पाणी करारदेखील रद्द केला आहे. या सर्व कारवाईसोबतच युद्धाचा संशयही व्यक्त केला जातोय. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्ध झाले, तर जगभरातील कोणते देश कोणाच्या बाजूने असतील?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर भारताला दोन आघाड्यांवर लढावे लागू शकते. चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्वश्रृत आहे. अशा परिस्थितीत भारताला दोन्ही देशांचा सामना करावा लागू शकतो. असे झाले तर भारतासाठी ही खूप कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण, चीन सर्व गोष्टींचा विचार करुन भारत-पाक युद्धात उतरले. 1962 मध्ये चीनने भारताला युद्धात हरवले होते, पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता भारताची ताकदही पूर्वीपेक्षा वाढली आहे.

कोणते देश भारताला पाठिंबा देतील?सध्या भारत जगात एक बलवान देश म्हणून उदयास आला आहे. भारताचे बहुतांश मोठ्या देशांशी खूप चांगले संबंध आहेत. यामध्ये सर्वात मोठा देश अमेरिका आहे, ज्याला जगातील सर्वात मोठी शक्ती म्हटले जाते. दोन्ही देश एकमेकांशी विविध प्रकारचे व्यापार करतात. गेल्या काही वर्षांत पाकिस्ताननेही अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दहशतवाद आणि इतर गोष्टींमुळे अमेरिका पाकिस्तानला फारसे महत्त्व देत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका भारताच्या बाजूने येऊ शकतो.

रशिया आणि इस्रायलदेखील भारताच्या बाजूनेअमेरिकेनंतर, भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शक्ती असलेल्या रशियाकडूनही पाठिंबा मिळू शकतो. गेल्या अनेक दशकांपासून रशिया आणि भारताचे संबंध खूप चांगले आहेत. भारताने रशियाकडून अनेक मोठी शस्त्रे खरेदी केली असून, भविष्यातही असे करार सुरू राहतील. यापूर्वीही रशियाने पाकिस्तानसोबतच्या युद्धात उघडपणे भारताला पाठिंबा दिला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंधही मजबूत आहेत. कारगिल युद्धादरम्यान इस्रायलने भारताला खूप मदत केली होती. आताही युद्ध पेटल्यास इस्रायलचा भारताला पाठिंबा असेल.

पाकिस्तानच्या बाजूने कोण येणार?अशा परिस्थितीत चीन वगळता दुसरा कोणताही मोठा देश पाकिस्तानला मदत करणार नाही. पाकिस्तानने भारताशी पंगा घेतला तर त्याला फक्त चीनवर अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान मुस्लिम देशांकडूनही मदत मागू शकतो, परंतु कोणताही इस्लामिक देश भारताविरुद्ध युद्धसदृश परिस्थिती निर्माण करेल अशी शक्यता खूपच कमी आहे. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान