शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:34 IST

४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना सोडावा लागणार भारत, २७ एप्रिलपासून सर्व व्हिसा रद्द  

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खात्री करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून दिली.

पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली होती. तसेच पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर मायदेशी परतावे असेही सांगितले. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश बुधवारी देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असले, तरी हा निर्णय पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदूंना लागू होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले. 

पाकिस्तानी हिंदू येतात धार्मिक विधींसाठी भारतातपाकिस्तानातील हिंदू नागरिक आपल्या नातेवाइकांच्या अस्थिविसर्जन व धार्मिक विधींसाठी भारतातील हरिद्वार, ऋषिकेश यांसारख्या तीर्थस्थळांना भेट देतात.  अनेक अडथळे असूनही दोन्ही बाजूंनी नातेसंबंध जपले जातात. विवाहसंबंधही जुळवले जातात. स्थानिक रहिवाशांच्या मते, केंद्र सरकारच्या आदेशामुळे अनेक विवाहांवर संकट निर्माण झाले आहे.

हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे : अमेरिकाअमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी शुक्रवारी सांगितले की, पहलगामध्ये अमानूष हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका भारताला सहकार्य करेल.  याआधी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

भारत सोडण्याच्या आदेशाने धार्मिक यात्रेवर आलेल्यांची वाढली चिंता४८ तासांत भारत सोडण्याच्या आदेशामुळे धार्मिक यात्रेसाठी आलेल्या पाक हिंदू नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली. आहे. त्यांना इतक्या तातडीने परत कसे जावे हेच समजेनासे झाले आहे. भारत सरकारने वाघा आणि अटारी सीमाचौक्या बंद केल्या आहेत. २७ मार्च रोजी ईश्वरदास हे आपल्या कुटुंबातील १३ सदस्यांसह वाघा सीमेमार्गे जोधपूरला आले. त्यांच्या ग्रुपमध्ये एकूण ५० लोक आहेत. त्यांच्या व्हिसाची मुदत २५ मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तेही गोंधळले आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहChief Ministerमुख्यमंत्रीPakistanपाकिस्तान