Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून मॉब लिंचिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये काही लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली, ज्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 10-12 जणांना अटक केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी घटनेची माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांनी काय म्हटले?या घटनेची माहिती देताना कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, बंगळुरुमध्ये मॉब लिंचिंगचे एक प्रकरण समोर आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान त्याने 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे दिले होते. हे ऐकून जवळच असलेल्या काही लोकांना राग आला आणि त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी केली कारवाई बंगळुरुमध्ये मॉब लिंचिंगच्या या घटनेनंतर पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी या घटनेत सहभागी असलेल्या 10-12 जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. गृहमंत्र्यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.