पहलगाम दहशतवादी हल्ला: तब्बल २६ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी सुरू केला आहे. त्या तिघांची रेखाचित्रे बुधवारी जारी करण्यात आली होती. आता नावासह त्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांच्यावर प्रत्येकी २० लाखांचे बक्षिसही जाहीर करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जम्मू काश्मीर पोलिसांनी पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची चित्रे प्रसिद्ध केली आहे. तिघांनाही वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे. पोलिसांनी तिघांवरही प्रत्येकी २० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. म्हणजे तिघांची माहिती देणाऱ्याला ६० लाख दिले जाणार आहेत.
वाचा >>"आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
तीन अतिरेक्यांची नावे काय?
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन दहशतवादी लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. तिघांपैकी दोघे पाकिस्तानी आहेत. त्यांची ओळख पटली असून, हासिम मूसा ऊर्फ सुलेमान, अली भाई ऊर्फ तल्हा भाई आणि आदिल हुसैन ठोकर अशी त्यांची नावे आहेत.
लष्कराकडून झाडाझडती
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी काश्मीर खोऱ्यात शोध मोहीम सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून सगळीकडे दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, दोन चकमकीही घडल्या आहेत.
हल्ल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल
या हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून कळलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी लोकांना वेगवेगळं केलं. धर्म विचारून दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनावरच गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने पर्यटकांची हत्या केली याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.