पान 8 : काणकोण पालिकेची 12 कामगारांना काढले

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:52+5:302015-08-08T00:23:52+5:30

धक्कादायक प्रकार : कामगारांमध्ये अस्वस्थता

Page 8: We have removed 12 workers from Kanakon corporation | पान 8 : काणकोण पालिकेची 12 कामगारांना काढले

पान 8 : काणकोण पालिकेची 12 कामगारांना काढले

्कादायक प्रकार : कामगारांमध्ये अस्वस्थता
काणकोण : येथील नगरपालिकेतील 12 कामगारांना कोणतेही कारण न दाखविता कामावरून कमी करण्यात आले आह़े त्यामुळे संबंधित कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली असून 31 जुलै रोजी ही नोटीस कामगारांना देण्यात आली.
2008 पासून पालिकेसाठी काम करणार्‍या या कामगारांना नियमित करण्यासंबंधीचे सोपस्कार एकाही मंडळाने केले नाही. उपलब्ध माहितीनुसार, हे कामगार रोजंदारीवर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत़ सध्या त्यांना 4 ऑगस्टच्या तारखेने नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी परत कामावर रुजू होण्यासंबंधीचा उल्लेख नसल्याने या कामगारांनी धास्ती घेतली आहे.
पालिका मंडळातील नगरसेवकांनी कधीच या कामगारांच्या हिताकडे पाहिलेले नाही. पालिका क्षेत्रात सफाईसारखे करणार्‍या या कामगारांना चांगल्या सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी पालिकेने कधीच पुढाकार घेतला नाही़ वर्षातून एकदा गणवेश, हातमोजे आणि बुट द्यावेत, नियमीत वेतन द्यावे यासंबंधी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असे अशोक गावकर या वाहन चालकाने सांगितल़े
2008 साली सर्व सोपस्कार पूर्ण करुन घेतलेल्या 12 कामगारांना बदललेल्या नियमानुसार आता कमी केल्याने परत कामावर घ्यायचे असल्यास परत एकदा सोपस्कार करावे लागणार आहेत. असेही कामगारांना कळविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
------------
ढँ3 : 0708-टअफ-10
कॅप्शन: काणकोण पालिकेने कामावरून कमी केलेले कामगार पत्रकारांशी आपले म्हणणे मांडताना. (छाया: संजय कोमरपंत)
----------------
चौकट : धक्कादायक प्रकार
प्रत्येक कामगारांच्या वेतनातून 500 ते 700 रुपये वजा करुन भविष्यनिर्वाह निधीमध्ये तेवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीतून जमा केली जाते. कामगाराला भविष्यनिर्वाह निधीचा खाते क्रमांक आणि पासबूक देण्यात आले आह़े कामगारांनी आपल्या खात्याची पडताळणी केली असता त्याना 2011 ऐवजी 2013 पासूनचीच रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आह़े 2011 पासून कापण्यात आलेला भविष्यनिर्वाह निधी त्यांच्या खात्यावर जमा केला नसल्याचे उघडकीस आल्यावर कामगारांनी यासंबंधी कार्यालयात विचारपूस केल्यानंतर त्यांना उलटसूलट उत्तरे देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
---------------------------

Web Title: Page 8: We have removed 12 workers from Kanakon corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.