पान ७- म्हादई लवादासमोर आज सुनावणी विर्डीचा आज फैसला?

By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:04+5:302015-04-24T00:55:04+5:30

डिचोली : महाराष्ट्राने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत विर्डी येथे धरण प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्णत्वाकडे नेऊन गोव्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत म्हादई लवादासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून आज या प्रकरणी अंतिम फैसला लवादाकडून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Page 7 Today's decision in the hearing against Mhadei Arbitration today? | पान ७- म्हादई लवादासमोर आज सुनावणी विर्डीचा आज फैसला?

पान ७- म्हादई लवादासमोर आज सुनावणी विर्डीचा आज फैसला?

चोली : महाराष्ट्राने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत विर्डी येथे धरण प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्णत्वाकडे नेऊन गोव्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत म्हादई लवादासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून आज या प्रकरणी अंतिम फैसला लवादाकडून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गोव्याने महाराष्ट्राच्या बेकायदा गोष्टींचा लवादासमोर पर्दाफाश केला होता. डिसेंबर २०१३ ला लवादाच्याशिष्टमंडळाने विर्डी धरणाला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला बरेच धारेवर धरले होते. ॲड. जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू भक्कमपणे मांडलेली असून विर्डी प्रकरणी सर्व प्रकारे तयारी केली आहे. आज लवादासमोर गोव्याला न्याय मिळण्याची शक्यता आहे.
फोटो ओळी-
विर्डी धरणामुळे डिचोली-साखलीला धोका असून याप्रकरणी आज फैसला होण्याची शक्यता आहे. (छाया : विशांत वझे)

Web Title: Page 7 Today's decision in the hearing against Mhadei Arbitration today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.