पान 7 : सुर्ल घाटमाथ्यावर सात वर्षांनी फुलली कारवी
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30
डिचोली : सात वर्षांनी फुलणारी कारवी सध्या सत्तरीतील सुर्ल घाटमाथ्यावर फुलायला सुरुवात झाली आहे. निसर्गातील हा चमत्कार याची देही याची डोळा पाहणे, हा माणसासाठी आनंददायी ठेवा असला तरी जंगली श्वापदांसाठी मधुपानाचा अनुपम अनुभव आहे.

पान 7 : सुर्ल घाटमाथ्यावर सात वर्षांनी फुलली कारवी
ड चोली : सात वर्षांनी फुलणारी कारवी सध्या सत्तरीतील सुर्ल घाटमाथ्यावर फुलायला सुरुवात झाली आहे. निसर्गातील हा चमत्कार याची देही याची डोळा पाहणे, हा माणसासाठी आनंददायी ठेवा असला तरी जंगली श्वापदांसाठी मधुपानाचा अनुपम अनुभव आहे. विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे गजानन शेट्ये, म्हापसा इको ट्रॅकच्या माध्यमातून पदभ्रमणींना म्हादई अभयारण्यातील धुधुंरज्याचो वझर येथे गेले असता सुर्ल गावातील काही अंतरावर असलेल्या कारवीच्या झुडपावरती सात वर्षांनी फुलणार्या कारवीच्या फुलांचे कळे दिसून आले. 2008 मध्ये ज्यावेळी पश्चिम घाटातील गोव्याच्या म्हादई अभयारण्यात कारवी फुलली होती. जांभळी, निळसर रंगाची छटा असलेली ही फुले या झुडपाच्या फांद्यांना लगडून येतात. तेव्हा निसर्गातल्या निळाईचा हा आनंद माणसांना प्रसन्न करतो; परंतु शेकडो फुलपाखरे कृमी-किटकांना मधूरसाच्या थेबांचा आनंद देतो. मधमाशांना कारवीच्या फुलांची चाहूल लागताच देहभान विसरून मधूरसाचा आनंद घेऊ लागतात. शिसम, घोटींग यासारख्या झाडांवर मधाच्या पाळ्या लगडू लागतात. मधाने चुस्त असलेली पोळी झाडांवर लटकू लागली की दूर रानावर असलेली अस्वले मधूरसासाठी झाडाभोवती पिंगा घालू लागतात. राजेंद्र केरकर यांनी गेल्या 28 वर्षांपासून कारवीच्या फुलणार्या चार वेळा आनंद घेतला आहे. त्यांनी सांगितले की, निसर्गातील हा सोहळा अनुपम असून जैविक संपदेच्या असंख्य घटकांना तो केवळ आनंदी सोहळा नसून त्यांना जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा देणारा महोत्सव आहे. महिन्याने ही कारवी व्यापक प्रमाणात फुलणार असून सुर्ल येथील पाईकाचे पाठार, दवले माणीचा सडा बहरून जाणार आहे. म्हादई अभयारण्याचा मुकूट शोभावा, असा हिवरे-खुर्द येथील तळवाच्या सज्जावरती विविध रंगी रानफुलांच्या पार्श्वभूमीवर कारवीचे फुलणे निसर्गप्रेमींना आगळावेगळा आनंद देणारे आहे. (प्रतिनिधी)छाया : सुर्ल घाटमाथ्यावर सात वर्षांनी फुलणारी कारवी बहरू लागली आहे.