पान 7 : गोशाळेसाठी आता 90 टक्के अनुदान
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:17+5:302015-07-31T23:03:17+5:30
- भटक्या गुरांमुळे अपघाताचा प्रश्न विधानसभेत

पान 7 : गोशाळेसाठी आता 90 टक्के अनुदान
- टक्या गुरांमुळे अपघाताचा प्रश्न विधानसभेतपणजी : भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिगर शासकीय संघटनांना गोशाळा उभारण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येईल. यासंबंधीची योजना लवकरच अधिसूचित करण्यात येईल, असे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोमुनिदाद, देवस्थानांकडे भरपूर जमिनी असून त्या गोशाळांसाठी वापरता येतील. या योजनेसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हायड्रोलिक मशीनसाठी 18 लाख रुपयांपर्यंत 90 टक्के खर्च, गुरे उचलणार्या वाहनांवरील चालकाला 10 हजार रुपये पगार, गुरे बांधण्यासाठी 5 हजार रुपये प्रतिचौरस मीटर, पशुखाद्यासाठी प्रती जनावर दरदिवशी 75 रुपये, गोशाळेला पशुवैद्यक (वेतन 30 हजार) आणि मदतनीस (वेतन 6 हजार) देण्याची तरतूद योजनेत आहे. महापालिकेला गुरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यात 1,141 गुरे पकडण्यात आल्याची माहिती तवडकर यांनी दिली. तरीही सुमारे 12 हजारांहून अधिक गुरे रस्त्यावर भटकत आहेत. त्यांचा वाहनचालकांना उपद्रव होत असल्याचे तवडकर यांनी सांगितले. भटक्या गुरांमुळे अपघात वाढले आहेत. गुरे रस्त्यावर येऊ नयेत यासाठी पावले उचलावीत. गुरांच्या मालकांना दंड करावा, अशी मागणी करणारा ठराव विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे आणि आमदार पांडुरंग मडकईकर यांनी संयुक्तपणे मांडला होता. गोशाळा उभारण्यासाठी सरकार निधी देणार असल्याची घोषणा मंत्र्यांनी केल्यानंतर दोघांनीही हा ठराव मागे घेतला. (प्रतिनिधी)