पान ७ पी बातमी
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:16+5:302015-07-03T23:00:16+5:30
साखळीत आज वीजपुरवठा खंडित

पान ७ पी बातमी
स खळीत आज वीजपुरवठा खंडितसाखळी : शनिवार, दि. ४ जुलै रोजी साखळी शहर फिडरवरील विद्युत पुरवठा यंत्रणेत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विठ्ठलापूर, लालबाग, काझीनवाडा, गोकुळ आईस्क्रीम केंद्र परिसर, कारापूर, तसेच विर्डी, कारेखाजन, वझरवाडा, घाडीवाडा या भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याची नोंद परिसरातील नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक वीज अभियंता शैलेश बुयै यांनी केले आहे.कुडचडेत आज कोकणी कविता स्पर्धाकुडचडे : सावर्डे-कुडचडे येथील शणैं गोंयबाब सेवा केंद्रातर्फे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दि. ४ रोजी कोकणी कविता स्पर्धा घेण्यात येणार आहे. न्यू एज्युकेशनल इन्स्टट्यिुटच्या बाजारातील जुन्या इमारतीत सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. डॉ. व्यंकटेश प्रभुदेसाई, सावर्डेचे सरपंच संजय नाईक यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे. या वेळी कविता कशी सादर करावी, या विषयावर डॉ. जयंती नायक, वसंत सावंत, विठ्ठल आवदियेकर आणि नामवंत कवी मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी कविसंमेलनही होईल. विजेत्यांना रोख बक्षिसे आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील. केरी पंचायत भवनाची आज पायाभरणीकेरी-तेरेखोल ग्रामपंचायत भवनाचा पायाभरणी सोहळा शनिवार, दि. ४ रोजी सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, पणजीचे आमदार तथा गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य अरुण बांधकर, केरी-तेरेखोलचे सरपंच जयंत केरकर उपस्थित राहणार आहेत.