पान 7 : कला अकादमीची भजन स्पर्धा
By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:07+5:302015-08-11T23:16:07+5:30
पणजी : कला अकादमी आयोजित पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरुष कलाकार राज्यस्तरीय भजन स्पर्धा शनिवार, दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, पणजी येथे होणार आहे. सायंकाळी 6 वाजता पुरुष कलाकार विभागीय व राज्यस्तरावरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत. कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ हे या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विभागीय केंद्रावरुन राज्यस्तरावर निवड झालेल्या पथकात र्शी गणराज संगीत व सांस्कृतिक भजनी मंडळ, किटला, र्शी वनदेवी संगीत संस्था, कायसूव, र्शी शांतादुर्गा भजनी मंडळ, कवळे, र्शी दादामहाराज भजनी मंडळ, बांदोडा (अ), र्शी सातेरी गोडेआम्रेश्वर राष्ट्रोळी भजनी मंडळ, नानोडा, संत तुकाराम कला व सांस्कृतिक भ

पान 7 : कला अकादमीची भजन स्पर्धा
प जी : कला अकादमी आयोजित पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरुष कलाकार राज्यस्तरीय भजन स्पर्धा शनिवार, दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, पणजी येथे होणार आहे. सायंकाळी 6 वाजता पुरुष कलाकार विभागीय व राज्यस्तरावरील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत. कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ हे या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विभागीय केंद्रावरुन राज्यस्तरावर निवड झालेल्या पथकात र्शी गणराज संगीत व सांस्कृतिक भजनी मंडळ, किटला, र्शी वनदेवी संगीत संस्था, कायसूव, र्शी शांतादुर्गा भजनी मंडळ, कवळे, र्शी दादामहाराज भजनी मंडळ, बांदोडा (अ), र्शी सातेरी गोडेआम्रेश्वर राष्ट्रोळी भजनी मंडळ, नानोडा, संत तुकाराम कला व सांस्कृतिक भजनी मंडळ, आमोणा, आंब्यानास भजनी मंडळ, राजबाग-काणकोण, आकार-पैंगीण, र्शी नागेश महारुद्र भजनी मंडळ, कुडका व मुशेले कलामंडळ, वास्को यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या दहाही पुरुष कलाकार भजनी पथकांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत कला अकादमी संकुलात उपस्थित राहणे आवश्यक आहे.