पान 7 : पेडणे भगवती हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:20+5:302015-07-31T22:25:20+5:30
कोरगाव : र्शी भगवती हायस्कूल, पेडणे येथे नववीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा थाटात साजरी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका आनंदवल्ली, साहाय्यक मुख्याध्यापक केशव पणशीकर यांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून समई प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर वेदांग ज्योतिषी याने सुविचार सांगितला. ऋषिके श बोंद्रे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. के शव पणशीकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. संगीत चमूने महानंदू कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गीत सादर केले. तबलासाथ शिक्षक विजय परब व समीर जाधव यांनी केली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामायण व महाभारत परिचय योजनेच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. र्शावणी नाईक हिने रामायणातील एक गोष्ट, तर वेद परब याने महाभारतामधील एक गोष्ट वाचून दाखवली. गुरुपौर्णिमेचा हा दिवस संस्कृत दिवस

पान 7 : पेडणे भगवती हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा
क रगाव : र्शी भगवती हायस्कूल, पेडणे येथे नववीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा थाटात साजरी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका आनंदवल्ली, साहाय्यक मुख्याध्यापक केशव पणशीकर यांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून समई प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर वेदांग ज्योतिषी याने सुविचार सांगितला. ऋषिके श बोंद्रे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. के शव पणशीकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. संगीत चमूने महानंदू कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गीत सादर केले. तबलासाथ शिक्षक विजय परब व समीर जाधव यांनी केली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामायण व महाभारत परिचय योजनेच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. र्शावणी नाईक हिने रामायणातील एक गोष्ट, तर वेद परब याने महाभारतामधील एक गोष्ट वाचून दाखवली. गुरुपौर्णिमेचा हा दिवस संस्कृत दिवस म्हणून साजरा के ला. केशव पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी देववाणी प्रवेश परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या प्रथम सहा विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आनंदवल्ली यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन आशिता मातोंडकर, गौरी पेडणेकर, साईश नारोजी यांनी केले आणि आभार मानले. (वार्ताहर) फोटो : भगवती हायस्कूलमध्ये व्यास प्रतिमेला फुले अर्पण करताना विद्यार्थी. (छाया : विनोद मेथर) आयएमजी 4856