पान 7 : राजीव गांधींना डिचोलीत अभिवादन
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
डिचोली : डिचोली गट युवा कॉँग्रसतर्फे स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावकरवाडा-डिचोली येथे आयोजित करण्यात आला होता. उत्तर गोवा युवा कॉँग्रेसचे सरचिटणीस लॉरेन्स ब्रागांझा, गोवा युवा कॉँग्रेस समितीचे सदस्य गौतम भगत, डिचोली युवा कॉँग्रेस अध्यक्ष र्शीरंग परब आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्रत्येकाने आपल्या बांधवांप्रती सद्भावना वाढीस लागेल यासाठी कार्यरत राहाणे काळाची गरज असल्याचे उद्गार लॉरेन्स ब्रागांझा यांनी काढले. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गोव्यात निसर्गाचे पर्यावरण संतुलित राहावे यासाठी वृक्षारोपण मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजे असे सांगून राजीव गांधींच्या स्वप्नातील भारत मूर्त स्वरूपात येण्यासाठी युवा शक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगून राजीव ग
पान 7 : राजीव गांधींना डिचोलीत अभिवादन
डिचोली : डिचोली गट युवा कॉँग्रसतर्फे स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावकरवाडा-डिचोली येथे आयोजित करण्यात आला होता. उत्तर गोवा युवा कॉँग्रेसचे सरचिटणीस लॉरेन्स ब्रागांझा, गोवा युवा कॉँग्रेस समितीचे सदस्य गौतम भगत, डिचोली युवा कॉँग्रेस अध्यक्ष र्शीरंग परब आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्रत्येकाने आपल्या बांधवांप्रती सद्भावना वाढीस लागेल यासाठी कार्यरत राहाणे काळाची गरज असल्याचे उद्गार लॉरेन्स ब्रागांझा यांनी काढले. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गोव्यात निसर्गाचे पर्यावरण संतुलित राहावे यासाठी वृक्षारोपण मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजे असे सांगून राजीव गांधींच्या स्वप्नातील भारत मूर्त स्वरूपात येण्यासाठी युवा शक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगून राजीव गांधींना अभिवादन केले. र्शीरंग परब म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या प्रगतीसाठी जे प्रय} केले, त्याची फळे आज 21 व्या शतकात पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फक्त घोषणाच करत असून डिजीटल इंडियाचे राजीवजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्ष कार्य हवे. यासाठी आता युवा कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपच्या फसव्या घोषणांना जनता कंटाळल्यामुळे राजीव गांधी यांचे स्वप्न जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. गौतम भगत यांनी राजीव गांधींच्या राजकीय जीवन प्रवासाचा आढावा घेतला. नियामत पठाण यांनी सूत्रसंचालन केले तर फहाद अंजुम यांनी आभार मानले. (लो. प्र.) फोटो : स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करताना लॉरेन्स ब्रागांझा, गौतम भगत, र्शीरंग परब व इतर. (दुर्गादास गर्दे) मेल