पान 7- हरवळेत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:49+5:302015-09-03T23:52:49+5:30

डिचोली : हरवळे येथील धबधबा नदीपात्रात बुधवारी आंघोळ करताना बुडालेल्या वेलितिन्हो कुतिन्हो या म्हापसा येथील युवकाचा मृतदेह गुरुवारी दुपारी नेव्हीच्या पाणबुड्यांनी पाण्याखालून काढला.

Page 7 The body of a young man who was missing in a hurry was found | पान 7- हरवळेत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

पान 7- हरवळेत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

चोली : हरवळे येथील धबधबा नदीपात्रात बुधवारी आंघोळ करताना बुडालेल्या वेलितिन्हो कुतिन्हो या म्हापसा येथील युवकाचा मृतदेह गुरुवारी दुपारी नेव्हीच्या पाणबुड्यांनी पाण्याखालून काढला.
बुधवारी सात युवकांचा गट हरवळे येथे आंघोळीसाठी आला असता त्यातील चौघेजण बुडत होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले होते. मात्र, कुतिन्होचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला नव्हता. गुरुवारी नेव्हीच्या पाणबुड्यांना पाचारण करून शोध घेतला असता त्याचा मृतदेह हाती लागला. तो उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला होता. नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 7 The body of a young man who was missing in a hurry was found