पान ५ शिरोडा ग्रामसभेत रस्ता डागडुजीवर चर्चा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:39+5:302015-02-11T00:33:39+5:30
शिरोडा : बाजार शिरोडा पंचायत प्रांगणात झालेल्या शिरोडा ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्याच्या बाजूला पथदीप बसविणे आदी विषयांवर चर्चा झाली.

पान ५ शिरोडा ग्रामसभेत रस्ता डागडुजीवर चर्चा
श रोडा : बाजार शिरोडा पंचायत प्रांगणात झालेल्या शिरोडा ग्रामसभेत गावातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्याच्या बाजूला पथदीप बसविणे आदी विषयांवर चर्चा झाली.सरपंच संदेश प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस पंचासह गटविकास कार्यालयातून निरीक्षक म्हणून बबिता पळेतकर उपस्थित होते. सरपंच प्रभुदेसाई यांनी स्वागत केले. पंचायत सचिव प्रसाद शेट यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत सादर केला. सिध्दार्थ प्रभू यांनी अहवाल सादर केला. नंतर या वर्षीच्या सुमारे १ कोटी ६३ लाखांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)