पान 5- वझरीत सापडली स्मृती शिळा
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:48+5:302015-09-03T23:05:48+5:30
डिचोली : साखळी आणि परिसराच्या इतिहासाला वेगळी दिशा देणारी एक ऐतिहासिक स्मृति शीळा साखळी नगरपालिका क्षेत्रातील वझरी गावातील तळपार येते सापडलेली आहे.

पान 5- वझरीत सापडली स्मृती शिळा
ड चोली : साखळी आणि परिसराच्या इतिहासाला वेगळी दिशा देणारी एक ऐतिहासिक स्मृति शीळा साखळी नगरपालिका क्षेत्रातील वझरी गावातील तळपार येते सापडलेली आहे.ही स्मृति शीळा धर्मप्रवासाप्रीत्यर्थ फिरणार्या यात्रेकरूची किवा जैन भिक्षूची असल्याचे मत इतिहास पुरातत्व अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. गोवा राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर यांच्या समवेत इतिहासाचे अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी या स्मृती शिळेची पाहणी केली.वझरीकर यांनी वाळवंटी नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेल्या वझरी गावात सापडलेली ही स्मृति शिळा पोतरुगीजपूर्व काळात व्यापार उद्योग, धर्मप्रसार या दृष्टीने संचार करणार्या लोकांनी गजबजलेल्या गावाचा इतिहास सांगणारी आहे. वझरीतील या जागेवरून होड्या, जहाजे आमोणामार्गे मांडवीत जात असल्याचे त्यांनी सांगितले.चालण्याच्या स्थितीत असलेल्या या भिक्षुकाचे चित्र या स्मृति शिळेवर कोरलेले असून त्याच्या मस्तकी सातली (छत्री) असून सदर भिक्षू नदीच्या दिशेने चालत असल्याचे चित्रीत केलेले आहे.पुरातत्व अभ्यासक वरद सबनीस यांनी ही स्मृति शिळा जैन भिक्षूची असल्याचे सांगून त्याच्यावर कोरलेल्या चंद्र सूर्य याची किर्ती आ चंद्र सूर्य नांदो हे सूचित करते.हाती कमंडलू धारण करून जाणारा हा श्वेतांबर पंथीय जैन भिक्षू असावा आणि त्याच्या डोक्यावर असलेले छत्र त्याचे महत्त्व सूचीत करत असल्याचे स्पष्ट होते.इतिहासाचे अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या मते स्मृती शिळेवरती चित्रीत केलेला भिक्षू कुडणे येथील पाश्वनाताच्या जैन मंदिराची किंवा हरवळे येथील नदीच्या पल्याड लोहगड (कुडणे) येथे असलेल्या महाप्रभू वल्लभाचार्य यांच्या बैठकीशी संबंधित यात्रेकरू किंवा भिक्षू असला पाहिजे असे सांगितले.वझरी तळपार येथे ही स्मृती शिळा सापडली आहे. तिथून 2 कि.मी. अंतरावर विर्डी तर 4 कि.मी. आमोणा गाव वसलेला आहे. वझरी येथे ख्रिस्ती व हिंदुची वस्ती आहे. या ठिकाणी अशा प्रकारची पाषाणी मूर्ती पहिल्यांदाच आढळलेली असन या परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)फोटो ओळी-वझरी-साखळी येथे सापडलेली ऐतिहासिक स्मृति शिळा. (विशांत वझे)