पान ५ : नेत्रावळी खुनी हल्ला प्रकरणी एकाची साक्ष नोंद
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:26+5:302015-07-16T15:56:26+5:30
मडगाव : नेत्रावळी येथील विद्याधर देसाई या ज्येष्ठ नागरिकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी बुधवारी विशाल देसाई यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयात नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली.

पान ५ : नेत्रावळी खुनी हल्ला प्रकरणी एकाची साक्ष नोंद
म गाव : नेत्रावळी येथील विद्याधर देसाई या ज्येष्ठ नागरिकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी बुधवारी विशाल देसाई यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयात नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली.२९ ऑगस्ट २0१३ रोजी सकाळी साडेदहा वाजता नेत्रावळी येथील पंचायतीजवळ वडील विद्याधर देसाई यांच्यावर जितेंद्र प्रभुदेसाई याने हल्ला केल्याची माहिती कुणीतरी अज्ञाताने मला भ्रमणध्वनीव्दारे दिली. मी त्वरित घटनास्थळी गेलो असता, जितेंद्रने वडिलांच्या स्कुटरची मोडतोड केली होती. मी जखमी वडिलांना १0८ रुग्णवाहिकेतून सांगे येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. या घटनेपूर्वी जमिनीच्या वादातून जितेंद्र प्रभुदेसाई यांनी गंभीर स्वरूपाची धमकी दिली होती, असे विशालने आपल्या साक्षीत सांगितले. या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार सूरज आरोलकर यांनी यापूर्वी साक्ष बदलली आहे. हा खटला अंतिम टप्प्यात पोहोचला असून, २७ जुलै रोजी या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन पनाळकर यांची साक्ष होणार आहे. (प्रतिनिधी)