पान 5 :मुरगावात

By Admin | Updated: July 31, 2015 23:02 IST2015-07-31T23:02:36+5:302015-07-31T23:02:36+5:30

मुरगावात दोन तास वाहतूक ठप्प

Page 5: Murgaon | पान 5 :मुरगावात

पान 5 :मुरगावात

रगावात दोन तास वाहतूक ठप्प
वास्को : फ ोर्स या संघटनेशी संबंधित शिक्षण संस्थांत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांनी फोर्सने चालवलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी शुक्रवारी सकाळी चिखली व वरुणापुरी, मांगोर हिल जंक्शनवर रास्ता रोको केला.
वरुणापुरी, मांगोर हिल जंक्शनवर अवर लेडी ऑफ कांदेलारिया बायणा, सेंट तेरेझा हायस्कूल (मांगोर हिल), सेंट जोसेफ हायस्कूल (वास्को) या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे सुमारे 500 पालक सकाळी गोळा झाले. त्यांनी सुमारे दोन तास सरकारविरोधात जोरदार घोषणा देत रस्ता अडवला.
मुरगावचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल, उपजिल्हाधिकारी साबाजी शेटये यांनी धाव घेऊन कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली. या वेळी पोलीस फाटा तैनात होता. पोलीस निरीक्षक राजन मडगावकर जमावावर नियंत्रण ठेवून होते. दोन तासांनंतर रस्ते वाहतुकीस मोकळे झाले.
या रास्ता रोकोमुळे वास्को शहरातून ये-जा करणारी शेकडो वाहने दोन तास वरुणापुरी महामार्ग, चिखली जंक्शन, दाबोळी विमानतळ, वाडे, बायणा भागात अडून पडली होती. (वार्ताहर)

क्रीडामंत्री अडकले
वेर्णा येथील पालकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे दीड तास वाहतुक खोळंबली. क्रीडामंत्री रमेश तवडकर हेही गर्दीत अडकले. या वेळी पालकांनी तवडकरांपाशी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.



फ ोटो आहे : 3107 वीएएस 02
ओळी : चिखली व वरुणापुरी येथे आंदोलनामुळे ठप्प झालेली वाहतूक.
सर्व छाया : शेखर कळंगुटकर

Web Title: Page 5: Murgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.