पान 5 : लीड : फोंड्यात व्यापार्यांचे पोलीस ठाण्यासमोर धरणे
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30
संघर्ष पुन्हा पेटला : विक्रेत्याला मारहाण, एकास अटक, दहा विक्रेत्यांची तक्रार

पान 5 : लीड : फोंड्यात व्यापार्यांचे पोलीस ठाण्यासमोर धरणे
स घर्ष पुन्हा पेटला : विक्रेत्याला मारहाण, एकास अटक, दहा विक्रेत्यांची तक्रारफोंडा : फुटपाथवरील विक्रेत्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी व्यापार्याला अटक केली. या कारवाईनंतर व्यापारी संतप्त झाले. व्यापार्यांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले आणि व्यापार्याला सोडण्याची मागणी केली. या घटनेमुळे फोंड्यातील व्यापारी आणि फुटपाथवरील विक्रेत्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचे स्पष्ट झाले. बाजारात फुटपाथवर व्यवसाय करणार्या विक्रेत्यांना शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तसेच धमकी दिल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घारू सावंत यांना सोमवारी (दि. 7)अटक केली. याप्रकरणी रवींद्र शिव प्रधान व अन्य 10 विक्रेत्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. घारू सावंत यांना अटक केल्याचे कळताच बाजारातील सुमारे 100 व्यापार्यांनी पोलीस ठाण्यासमोर जमून त्यांच्या सुटकेची मागणी केली. यात महिला व्यापार्यांची संख्या मोठी होती. संध्याकाळी उशिरांपर्यंत हा जमाव पोलीस ठाण्याबाहेर होता. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. फोंड्याच्या पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 6) सकाळी फोंडा बाजारात हा मारहाणीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी 11 विक्रेत्यांनी पोलीस तक्रार दिली होती. तक्रारीत विष्णूदास मामलेकर, मुनीर, शांबा नाईक, संदेश नाईक, मोगू, माया नाईक व अन्य 50 व्यापार्यांनी आपले साहित्य उचलून नेल्याचे तसेच आपणास शिविगाळ करून मारहाण केल्याचे म्हटले आहे. बाजारातील प्रश्न वाटाघाटीने सोडविण्याच्या दृष्टीने आपण व्यापारी आणि पालिका मंडळ यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सावंत म्हणाल्या. सध्या दोन्ही गट परस्परविरोधी माहिती पुरवित असून या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गणेशचतुर्थीचा सण लक्षात घेता बाजारातील प्रश्नावर पोलिसांची भूमिका काय असेल, असे विचारले असता पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे असून पोलीस ते प्रामाणिकपणे करतील, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी घारू सावंत यांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)फोटो-0709-स्रल्ल-12फोटो कॅप्शन- फोंडा पोलीस ठाण्यासमोर घारू सावंत यांच्या सुटकेची मागणी करीत सोमवारी जमलेले व्यापारी. (छाया- शेखर नाईक)