पान ५ म्हापसा येथे कार्निव्हलचे डिसोझा यांच्या हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:23+5:302015-02-18T00:13:23+5:30
बार्देस : म्हापसा येथे मंगळवारी हजारो लोकांच्या उपस्थितीत कार्निव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते झाले. या वेळी हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो, म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा रूपा भक्ता, नगरसेवक सुधीर कांदोळकर, संदीप फळारी, दीपक म्हाडेश्री, तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. तसेच विविध समित्या निवडण्यात आल्या होत्या. त्या समित्याचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. सायं. ४ वा. म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चजवळ चित्ररथाचे उद्घाटन झाले. दरम्यान, बोडगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात मंडप उभारला होता. त्यात अनेक कार्यक्रम पार पडले.

पान ५ म्हापसा येथे कार्निव्हलचे डिसोझा यांच्या हस्ते उद्घाटन
ब र्देस : म्हापसा येथे मंगळवारी हजारो लोकांच्या उपस्थितीत कार्निव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते झाले. या वेळी हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो, म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा रूपा भक्ता, नगरसेवक सुधीर कांदोळकर, संदीप फळारी, दीपक म्हाडेश्री, तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. तसेच विविध समित्या निवडण्यात आल्या होत्या. त्या समित्याचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. सायं. ४ वा. म्हापसा येथील मिलाग्रीस चर्चजवळ चित्ररथाचे उद्घाटन झाले. दरम्यान, बोडगेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या पटांगणात मंडप उभारला होता. त्यात अनेक कार्यक्रम पार पडले. चित्ररथात गोव्यातील अनेक संघ सहभागी झाले. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक चित्ररथ पाहण्यास बार्देस, पेडणे तालुक्यांबरोबरच इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी) फोटो : म्हापसा येथे कार्निव्हल महोत्सवात सहभागी झालेले चित्ररथ. (प्रकाश धुमाळ) १७०२-एमएपी-१७ ते २१