पान ५ बेकायदेशीरपणे वास्तव्य; नायजेरियन दोषी
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:47+5:302015-06-02T00:03:47+5:30
म्हापसा : व्हिसाची मुदत संपून बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहाणार्या नायजेरियन नागरिकाला बार्देसातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. अडेलेके खलीद (३५) असे त्याचे नाव आहे.

पान ५ बेकायदेशीरपणे वास्तव्य; नायजेरियन दोषी
म हापसा : व्हिसाची मुदत संपून बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहाणार्या नायजेरियन नागरिकाला बार्देसातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. अडेलेके खलीद (३५) असे त्याचे नाव आहे.पासपोर्ट वैधतेच्या वेगवेगळ्या कलमांन्वये त्याला दोषी ठरविले आहे. बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असलेल्या नायजेरियन खलीद यास गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला कळंगुट पोलिसांनी अटक केली होती. तो पर्रा येथे वास्तव्य करून होता. वेगवेगळ्या कलमांन्वये शिक्षा ठोठावताना एका कलमाखाली त्याला एका महिन्याची कैद दिली आहे, तर दुसर्या कलमाखाली दोषी ठरवताना त्याला सहा महिने २२ दिवसांची शिक्षा दिली आहे. तसेच ५ हजार रुपये दंडही केला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास १० दिवसांची साधी कैद न्यायालयाने दिली आहे. सरकारच्या बाजूने सरकारी वकील नीता मराठे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)