पान ५ : कुंकळ्ळी-बेतूल मार्गावरील बससेवा बंद
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:35+5:302015-07-13T01:06:35+5:30
प्रवाशांचे हाल

पान ५ : कुंकळ्ळी-बेतूल मार्गावरील बससेवा बंद
प रवाशांचे हालमडगाव : कुंकळ्ळी ते बेतूल मार्गावर असलेली बससेवा पूर्णपणे बंद पडलेली असल्याने या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: शिक्षकांना व कामासाठी जाणार्या मजुरांना बससेवा उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर बस वाहतूक नसल्यामुळे प्रवाशांवर कुंकळ्ळी ते चिंचोणे व चिंचोणे ते बेतूल, असा लांबचा प्रवास करण्याची वेळ येते.या मार्गावर पूर्वी अनेक बसगाड्या होत्या. सांगे ते बाराडी अशी बससेवा उपलब्ध होती. गेल्या काही वर्षांपासून ही बससेवा अचानक बंद झाली असून बाराडीपर्यंत जाणार्या बसगाड्या आता कुडचडे ते कुंकळ्ळी असाच प्रवास करतात. कदंब महामंडळाने मडगाव ते कुंकळ्ळीमार्गे बेतूलपर्यंत बससेवा सुरू केलेली होती. ही बसही आता बंद झालेली आहे. शाळेच्या वेळेवर या बसगाडीची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ही बससेवा सोयीची पडत होती. आता अचानक बससेवा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना व इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात कुंकळ्ळीतील काही प्रवाशांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन शिंदे यांना निवेदन सादर केले आहे. कुंकळ्ळी-किटला ते खणगिणी मार्गावरीलही बससेवा सध्या स्थगित असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कुंकळ्ळी-खणगिणी मार्गावरील बससेवा सुरळीत नसल्यामुळे या भागातील लोक संतप्त झालेले असून कुंकळ्ळी व मडगावात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांनाही बससेवा नियमितपणे नसल्यामुळे पायपीट करावी लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधितांना यासंदर्भात अनेक निवेदने सादर करूनही कोणतीच सुधारणा होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. बसमालकांच्या म्हणण्याप्रमाणे या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी असल्यामुळे बससेवा सुरू ठेवणे नुकसानीचे होते. सरकारने यात लक्ष घालून निदान या मार्गावर कदंब बससेवा सुरू करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)