पान ५- हल्ल्यामागच्या सूत्रधारांना अटक करा

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

डिचोलीत ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडतर्फे सभा

Page 5- Arrest the attackers | पान ५- हल्ल्यामागच्या सूत्रधारांना अटक करा

पान ५- हल्ल्यामागच्या सूत्रधारांना अटक करा

चोलीत ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडतर्फे सभा
डिचोली : सर्पमित्र अमृतसिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा डिचोली येथे ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडतर्फे झालेल्या जाहीर सभेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यामागच्या सूत्रधारांना त्वरित अटक करावी व अमृतसिंग यांना पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सोमवारी सायंकाळी आयोजित या सभेत विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी संदीप सुतार, भगवान हरमलकर, राजन कडकडे, नरेश कडकडे, पत्रकार दुर्गादास गर्दे, माजी आमदार राजेश पाटणेकर, कमलेश बांदेकर, कृष्णा पळ, शैलेश जाधव, भरतेश गुल्लनवार, आनंद नार्वेकर, श्रीनिवास नातू व अन्य वक्त्यांनी विचार व्यक्त केले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थितांनी दिला. गोरक्षा अभियान गोवाचे अध्यक्ष भगवान हरमलकर, श्रीराम गोसंवर्धन केंद्र वाळपईचे हनुमंत परब यांनी या वेळी गोरक्षा अभियानाची सविस्तर माहिती दिली. अमृतसिंग यांच्यावरील हा हल्ला शेवटचा ठरावा, यापुढे गोरक्षा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचे धाडस कुणालाही होणार नाही, अशी सुरक्षित व्यवस्था होणे काळाची गरज असल्याचे या वेळी वक्त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ॲड. बालाजी मयेकर यांनी केले.
फोटो : अमृतसिंग यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध सभेत बोलताना हनुमंत परब. (छाया : दुर्गादास गर्दे)

Web Title: Page 5- Arrest the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.