पान ५ : आमच्या व्यवसायाला मान्यता द्या

By Admin | Updated: July 15, 2015 00:14 IST2015-07-15T00:14:59+5:302015-07-15T00:14:59+5:30

- रेंट अ कार असोसिएशनचे कळंगुटमध्ये आंदोलन

Page 5: Approve our business | पान ५ : आमच्या व्यवसायाला मान्यता द्या

पान ५ : आमच्या व्यवसायाला मान्यता द्या

-
ेंट अ कार असोसिएशनचे कळंगुटमध्ये आंदोलन
म्हापसा : टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी सरकारने परमीट द्यावे, तसेच असोसिएशनलाही मान्यता द्यावी, अशी मागणी करत रेंट अ कार असोसिएशनतर्फे मंगळवारी कळंगुट येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले.
कळंगुट येथील चर्चजवळ हे आंदोलन झाले. या वेळी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या वेळी भाडेप˜ीवर वाहन देणार्‍या या व्यावसायिकांनी सरकारचा निषेध केला. तसेच आमदार मायकल लोबो यांचाही निषेध केला. मागील बरीच वर्षे आम्ही हा व्यवसाय प्रामाणिकपणे करतो; पण सरकारने अजूनपर्यंत आमच्या व्यवसायाला मान्यता दिली नसल्याचे मत उपाध्यक्ष नितेश चोडणकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोव्यात पुष्कर नामक कंपनीला दिलेल्या परवान्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत चालला आहे. तसेच शेजारील राज्यातील पर्यटकही अशा प्रकारची वाहने घेऊन येतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. असोसिएशनचे ३०० सदस्य असून या सदस्यांकडे सुमारे ९०० वाहने आहेत. बर्‍याच जणांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे; पण त्यांना व्यवसाय करण्यासाठी परमीट दिले नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे अमित शिरोडकर यांनी सांगितले. पोलिसांकडून होणारी सतावणूक व वाढती स्पर्धा यांमुळे हा व्यवसाय करणे त्रासदायक झाल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यात खास करून कळंगुट येथे बरीच बेकायदा बांधकामे आहेत. तसेच बरेच बेकायदेशीर व्यवसाय बिनबोभाटपणे चालू असतात. या व्यावसायिकांना अभय देऊन सरकार आमच्यावर अन्याय का करते, असा प्रश्न शिरोडकर यांनी उपस्थित केला. (खास प्रतिनिधी)
फोटो : कळंगुट येथे रेंट अ कार असोसिएशनच्या आंदोलनात सहभागी झालेले सदस्य. (प्रसाद म्हांबरे) १४०७-एमएपी-१९

Web Title: Page 5: Approve our business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.