पान 4- रेती वाहतूक प्रकरणी ट्रकचालकांची जामिनावर सुटका
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30
बार्देस : पेडणे-न्हयबाग येथे गुरुवारी (दि. 6) बेकायदा रेती भरत असताना पाच ट्रक म्हापसा पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पाच ट्रकचालकांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 7) त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.

पान 4- रेती वाहतूक प्रकरणी ट्रकचालकांची जामिनावर सुटका
ब र्देस : पेडणे-न्हयबाग येथे गुरुवारी (दि. 6) बेकायदा रेती भरत असताना पाच ट्रक म्हापसा पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पाच ट्रकचालकांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 7) त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. म्हापसा पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गस्त घालत असताना न्हयबाग-पेडणे येथे पाच ट्रकांमध्ये बेकायदा रेती भरत असल्याची तक्रार भरारी पथकाला देण्यात आली. त्यानुसार पेडणे-न्हयबाग येथे छापा टाकून रेती भरत असताना पाच ट्रक जप्त केले. जप्त करण्यात आलेले ट्रकांमध्ये जीए 07 एफ 1556 चालक मधुकर नाईक, जीए 01 झेड 1265 चालक नीलेश कोले, जीए 03 टी 3899 चालक सतीश डिचोलकर, जीए 06 टी 2230 चालक निकलेश भोबे, जीए 11 टी 540 चालक रामदास वरक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) फोटो : म्हापसा पोलिसांनी न्हयबाग-पेडणे येथे जप्त केलेले ट्रक. (प्रकाश धुमाळ) 0708-एमएपी-12