पान ४ सीमकार्डचा गैरवापर करून नातेवाईकांना धमक्या

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

वास्को : एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीतील सीमकार्डचा गैरवापर करून त्या व्यक्तीच्या बंधूला दोघा संशयितांनी धमकी देणारे संदेश पाठविल्याची तक्रार वेर्णा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे़

Page 4 Threats to relatives by misusing the SIM card | पान ४ सीमकार्डचा गैरवापर करून नातेवाईकांना धमक्या

पान ४ सीमकार्डचा गैरवापर करून नातेवाईकांना धमक्या

स्को : एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीतील सीमकार्डचा गैरवापर करून त्या व्यक्तीच्या बंधूला दोघा संशयितांनी धमकी देणारे संदेश पाठविल्याची तक्रार वेर्णा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे़
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुआंव सी पेरेरा (रा. उतोर्डा) यांनी या बाबतीत उत्तोर्डा येथील रहिवासी आलेक्स आर्नाल्फ ो पेरेरा आणि लिलिया मार्टिन्स पेरेरा यांच्या विरुध्द तक्रार नोंदविली आहे़
तक्रारीप्रमाणे, दोन्ही संशयितांनी एका विशिष्ट हेतूने तक्रारदाराच्या भ्रमणध्वनीतील सीमकार्डचा वापर करून त्यांचे बंधू जॉफ्र ी पेरेरा यांच्या भ्रमणध्वनीवर धमकी देणारे संदेश पाठविले आहेत. वेर्णा पोलिसांनी भा़दं़सं़च्या ५०६ आणि ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Page 4 Threats to relatives by misusing the SIM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.