पान 4- पेडणे रेल्वेस्थानकाच्या प्रश्नाबाबत आज रेल्वेमंत्र्यांना निवेदन
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30
विर्नोडा पंचायतीचे सरपंच सीताराम परब यांची माहिती

पान 4- पेडणे रेल्वेस्थानकाच्या प्रश्नाबाबत आज रेल्वेमंत्र्यांना निवेदन
व र्नोडा पंचायतीचे सरपंच सीताराम परब यांची माहितीबार्देस : पेडणे रेल्वे स्थानकावरील गैरसोयी दूर करणे व महत्त्वाच्या रेल्वेंना पेडणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दि. 8 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती विर्नोडा पंचायतीचे सरपंच तथा युवा सामाजिक कार्यकर्ते अँड. सीताराम परब यांनी दिली.पेडणे रेल्वेस्थानकावर एका कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दि. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा. येणार आहेत. सीताराम परब म्हणाले की, पेडणे रेल्वेस्थानक सुसज्ज व्हावे. तसेच रेल्वेस्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा द्यावा. रेल्वे तिकिटांचा कोटा वाढवावा. तसेच प्लेटफॉर्मवरील समस्या दूर कराव्यात, अशा मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.रेल्वे स्थानकावरील कोणकोणत्या समस्या प्रामुख्याने आहेत, यावर पेडणे तालुक्यातील काही सेवाभावी नगारिकांनी अभ्यास करून या मागण्या मार्गी लागण्यासाठी अँड. परब व विश्वास कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीतर्फे आतापर्यंत मुख्यमंत्री, सभापती यांच्याकडे चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री यांना निवेदनही देण्यात आले आहे.कोकण रेल्वेचा औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच अँड. परब यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.(प्रतिनिधी)