पान ४- झरींत साकवाळ येथे दारू कारखान्यावर छापा
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:55+5:302014-12-20T22:27:55+5:30
वास्को : येथील अबकारी खात्याचे अधीक्षक नारायण नेरुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झरींत सांकवाळ येथे छापा टाकून बेकायदेशीर दारू तयार करणार्या ६ जणांच्या टोळीला अटक करून सुमारे लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे.

पान ४- झरींत साकवाळ येथे दारू कारखान्यावर छापा
व स्को : येथील अबकारी खात्याचे अधीक्षक नारायण नेरुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झरींत सांकवाळ येथे छापा टाकून बेकायदेशीर दारू तयार करणार्या ६ जणांच्या टोळीला अटक करून सुमारे लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे.झरींत येथे बेकायदेशीरपणे दारू तयार होत असल्याची माहिती आंध्र प्रदेश येथील अबकारी अधिकार्यांकडून येथील अबकारी अधिकार्यांना मिळाल्यानंतर येथील अबकारी अदीक्षक नेरुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. पेरेरा व इतर कर्मचार्यांनी गुरुवारी मध्यरात्री झरींत येथ ेचौगुले इंडस्ट्रीच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये टाकला, तेव्हा मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार होतअसल्याचे आढळून आले.सरकारी अधिकार्यांनी केलेल्या चौकशीमध्ये हरियाणा येथे पाठविण्यासाठी बनावट दारू तयार करण्याचे काम सुरू होते. लगेच तेथील सर्व मालपंचनामा करून जप्त केला. एकूण २ हजार लिटर स्पिरीट असलेली १५ बॅरल, ४५६ दारूने भरलेल्या बाटल्या, तसेच रॉयल स्टेग, सेलेब्रेशन रम व इतर नामांकित ब्रॅण्ड असलेले बनावट लेबल जप्त करण्यात आले.झरींत येथे बनावट दारू तयारकरून ती हरियाणा, कर्नाट, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथे पाठविण्यात येत होती.याप्रकरणी सुंदर राजू, गोविंद राज, रमेश, रमय्या व असोक कुमार तसेच रमा नागू नावाच्या महिलेला अटक करून येथीलप्रथम श्रेणी न्यायालयासमोर उभे केलेअसता सात दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे. बेकायदेशीर दारू करण्यात येत असलेली शेड रमेश नावाच्या मालकीचा असून तो बंगळूर येथे वास्तव्य करून आहे. (प्रतिनिधी)